बनावट विवाह प्रमाणपत्र सादर करणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मुंबई - बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एजंटला शुक्रवारी (ता. 19) बीकेसी पोलिसांनी अटक केली. एजाज हुसेन शेख ऊर्फ अज्जू असे त्याचे नाव आहे.

मुंबई - बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या एजंटला शुक्रवारी (ता. 19) बीकेसी पोलिसांनी अटक केली. एजाज हुसेन शेख ऊर्फ अज्जू असे त्याचे नाव आहे.

एजाजच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील अमेरिकन दूतावासात एजाज (रा. सांताक्रूझ) शुक्रवारी मुलाखतीसाठी गेला होता. तेथे त्याने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे तेथील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी एजाजला त्याविषयी काही प्रश्‍न विचारले. त्यांची उत्तरे तो देऊ शकला नाही. अखेर संबंधित अधिकाऱ्याने बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली.