इन्स्टाग्रामवरून बदनामी करणाऱ्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

मुंबई - खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे ई-मेल खाते हॅक करून तिचे व तिच्या पतीचे छायाचित्र आक्षेपार्ह संदेशासह इन्स्टाग्रामवर अपलोड करणाऱ्याला नुकतीच वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अटक केली. त्यासाठी आरोपीने महिलेच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम खातेही तयार केले होते. चिंटू रमेश हरपलानी (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जामीन दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित महिलेने नुकतीच याविषयी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार केली. तिने म्हटले आहे की, हरपलानी याच्याशी यापूर्वी तिचे प्रेमसंबंध होते. पत्नीला घटस्फोट दिल्यापासून तो या महिलेचा पाठलाग करत होता.

मुंबई - खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे ई-मेल खाते हॅक करून तिचे व तिच्या पतीचे छायाचित्र आक्षेपार्ह संदेशासह इन्स्टाग्रामवर अपलोड करणाऱ्याला नुकतीच वांद्रे-कुर्ला संकुल पोलिसांनी अटक केली. त्यासाठी आरोपीने महिलेच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम खातेही तयार केले होते. चिंटू रमेश हरपलानी (वय 38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला जामीन दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित महिलेने नुकतीच याविषयी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार केली. तिने म्हटले आहे की, हरपलानी याच्याशी यापूर्वी तिचे प्रेमसंबंध होते. पत्नीला घटस्फोट दिल्यापासून तो या महिलेचा पाठलाग करत होता. तिने त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याने तिचा ई-मेल हॅक केला.