खंजेरी वादक सत्यपाल महाराजांवर प्राणघातक हल्ला

योगेश फरपट
बुधवार, 17 मे 2017

विदर्भातील प्रख्यात सप्तखंजेरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईतील कार्यक्रमात प्राणघातक हल्ला झाला आहे. भर कार्यक्रमात कुणाल जाधव नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर सध्या त्यांच्यावर सध्या मुंबईतील केइएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई - विदर्भातील प्रख्यात सप्तखंजेरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईतील नायगाव दादर येथे चाकूने प्राणघातक हल्ला झाला आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून महाराजांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी महाराजांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कुणाल जाधव नावाच्या माथेफिरूने अचानकपणे त्यांच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे महाराजांचे प्राण वाचले. त्यांच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भोईवाडा पोलिसांनी जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हल्ल्याचे नेमक्‍या कारणाचा पोलिस तपास घेत आहेत.

नाहीतर आरोपी मोकाटच
यापूर्वी गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांची हत्या करण्यात आली. सरकार अद्यापही आरोपींचा शोध घेऊ शकले नाही. महाराजांनी सतर्कता दाखवली नसती आणि नागरिकांनी वेळीच धाव घेतली नसती तर कुणाल जाधव सुद्धा मोकाटच फिरला असता अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.