"विनाडिग्रीचा कोणी डॉक्टर बनत असेल तर..."

Nawab-Malik-Baba-Ramdev
Nawab-Malik-Baba-Ramdev
Summary

मंत्री नवाब मलिकांचा योगगुरू बाबा रामदेवांना उत्तर

मुंबई: गेले काही दिवस योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) विरूद्ध डॉक्टर्स (Doctors) असा वाद रंगताना दिसतोय. बाबा रामदेव यांनी डॉक्टरांविषयी एक वक्तव्य (Statement) केलं होतं. या वक्तव्याचा अनेकांनी निषेध (Protest) केला. डॉक्टरमंडळींनी तर त्यांच्या वक्तव्याविरोधात निदर्शनेदेखील केली. बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीका (Criticism) होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उत्तर दिले. विनाडिग्रीचा कोणी स्वत:च डॉक्टर बनत असेल, तर अशा डॉक्टर्सवर कारवाई केली पाहिजे अशा शब्दात नवाब मलिक यांनी बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल केला. (Baba Ramdev Doctors Statement NCP Nawab Malik reaction)

Nawab-Malik-Baba-Ramdev
CSMT स्टेशनचं रूपडं पालटणार; पुनर्विकासासाठी 9 कंपन्या पात्र

"ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल काऊन्सिलकडून कुठलीही डिग्री घेतलेली नाही, तो उपचाराचा सल्ला देऊ शकत नाही. विनाडिग्रीचा कोण डॉक्टर बनत असेल किंवा स्वत:च स्वत:ला डॉक्टर म्हणत असेल, तर अशा डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी मी केली आहे. बाबा रामदेव यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल काऊन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व लोकांना सल्ला देऊ शकतात. पण जर ते आपले दुकान किंवा कारभार चालवण्यासाठीच वक्तव्य करत असतील, तर ही गोष्ट चुकीची आहे", असे नवाब मलिक म्हणाले.

Nawab-Malik-Baba-Ramdev
१२ आमदारांचा प्रस्ताव अजूनही मुख्यमंत्री कार्यालयातच?

"केंद्रीय आरोग्य विभागाने बाबा रामदेव यांच्या विधानाची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथी या सर्व मेडिसिन्सना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल काऊन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पध्दतीने जी थेरपी आहे, तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था बनवण्यात आली आहे. बाबा रामदेव डॉक्टर नाहीत. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री त्यांच्याकडे नाही. परंतु उपचार करण्यावरुन ते सतत काहीना काही विधाने करत असतात. अलोपॅथीवर वक्तव्य करत असतात. आयुर्वेदावरुन उपचाराचे सल्ले देत असतात. वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालत असताना अविश्वास आणि अंधविश्वासाचा प्रचार कोणी करत असेल, तर ते देशाला घातक", असा टोला त्यांनी लगावला.

Nawab-Malik-Baba-Ramdev
सुशांतला दिले जाणारे ड्रग्स पुरवणारा सापडला? NCBची कारवाई

राज्यातील १२वीच्या परिक्षांबद्दल...

"पंतप्रधानांनी CBSE बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. घोषणा करणे आणि त्या घोषणेनंतर काय पर्याय उपलब्ध आहेत याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील बारावीच्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर होताना त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल, याचा सगळा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल", असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com