बाळासाहेब ठाकरे केडीएमटी बस डेपोची दुरावस्था

kalyan
kalyan

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचा परिवहन उपक्रमाच्या कल्याण पश्चिम मधील वसंत व्हॅली येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे परिवहन डेपो बंद करण्यात आला असून तेथे भंगार बसेस उभ्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू झालेल्या परिवहन आगाराची दुरावस्था झाली असून तो डेपो 9 ऑक्टोबर पूर्वी सुरू न झाल्यास परिवहन समिती सदस्य आणि अधिकारी वर्गाला कार्यालय मध्ये पाय ठेऊ देणार नसून तेथे धरणे आंदोलन करू असा इशारा शिवसेना पदाधिकारी रवि कपोते आणि दत्तात्रय खंडागळे यांनी आज दिला आहे. पालिकेत आणि परिवहन समितीमध्ये युतीची सत्ता असताना पदाधिकारी वर्गाने आंदोलनाचा इशारा दिल्याने सत्ताधाऱ्यांना घरचा आहे दिल्याची चर्चा रंगली आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रम दिवसेंदिवस वाढत असताना बसचे संचलन व्हावे यासाठी कल्याण पश्चिम मधील वसंत व्हॅली येथे डेपो बांधण्यात आला. त्याला शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले तर 22 जानेवारी 2015 मध्ये युवा सेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते. 

त्यावेळी शिवसेनेचे परिवहन समिती सभापती रवि कपोते आणि सदस्य दत्तात्रय खंडागळे होते. हे दोघे ही त्या समिती मधून निवृत्त झाल्यावर या डेपोला घर घर लागली, शहरातील वाढती वस्ती पाहता हा डेपो फायदेशीर ठरावा म्हणून हा डेपो बांधण्यात आला. मात्र सध्या डेपो बंद करण्यात आला असून तेथे भंगार बसेस धूळ खात पडल्या आहेत. याची माहिती मिळताच आज परिवहन माजी सभापती रवि कपोते आणि माजी सदस्य दत्तात्रय खंडागळे यांनी डेपोला भेट दिली. यावेळी गेट लाकडी बांबू आणि फळ्याने बांधून बंद करण्यात आला होता. 

यावेळी कपोते आणि खंडागळे यांनी लाकडी गेट तोडून आपला राग व्यक्त केला आणि डेपोच्या परिसर पाहणी केली. प्रत्येक शिवसैनिकांचे दैवत म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असून त्यांच्या नावाने सुरू झालेला डेपो बंद आणि दुरावस्था आम्ही सहन करणार नाही, कमानीवर ही अर्धवट असलेले नाव बदलावे, हा डेपो 9 ऑक्टोबर पर्यंत सुरू न झाल्यास शिवाजी चौकात परिवहन समिती कार्यालयमध्ये समिती सदस्य आणि अधिकारी वर्गाला प्रवेश करून देणार नाही, तर धरणे आंदोलन करू असा इशारा रवि कपोते आणि दत्तात्रय खंडागळे इशारा दिल्याने खळबळ माजली आहे. तर डेपो माझ्या कालावधीत बंद झाला नसून शिवसेनेच्या सभापती आणि महापौर यांच्या कालावधीत बंद करण्यात आला आहे त्याचे कारण मनुष्यबळ कमी होते. बंद करण्याचा कुठलाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नसून 1 ऑक्टोबर पासून बसेस सोडण्यात येणार येईल अशी माहिती सभापती सुभाष म्हस्के यांनी दिली .यामुळे राजकारण चांगलेच तापणार आहे. 

पालिका आणि परिवहन समिती मध्ये शिवसेना भाजपा युतीची सत्ता असून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेल्या डेपो बंद आणि दुरावस्था झाली असून आता याबाबत शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाल्याने या आंदोलनामुळे सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिल्याची चर्चा असून डेपो सुरू होतो का याकडे लक्ष्य लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com