वज्रेश्वरी येथील रस्त्यांच्या दुरावस्थेने नागरिक खड्ड्यात

Bad Condition Of Roads In Vajreshwari Thane Mumbai
Bad Condition Of Roads In Vajreshwari Thane Mumbai

वज्रेश्वरी : येथील जिल्ह्याच्या प्रमुख मार्गाचे सुरू असलेले रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम, कामासाठीच्या रस्त्याखालील ड्रेनेज व गटारीचे वाहिनीचे काम व त्यामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था तसेच नादुरुस्त जलवाहिनीमुळे मुख्य रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे तसेच उघडी अर्धवट गटारी यामुळे या ठिकाणी दररोज अपघात होऊन शाळकरी विद्यार्थी व भविकांना पावसाळ्यात अपघात होत असून जखमी होत आहे. तसेच अबालवृद्ध हे या ठिकाणी चालता येत नसल्याने खड्ड्यांमध्ये पडत आहे व वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा येऊन धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीचा हा धोका लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज प्रवासी व येथील संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

या संदर्भात येथील ग्रामस्थ आक्रमक झाले असून मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. येथील वज्रेश्वरी देवी मंदिरा जवळून जाणारा अंबाडी उसगांव या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम गेली दोन महिन्यापासून सुरु आहे. तेही अर्धवट आहे. वज्रेश्वरी मध्ये सखल भाग असल्याने येथे काँक्रीटीकरण मंजूर केले आहे. मात्र येथील मुख्य खराब झालेल्या रास्ता अजुनपर्यंत संबंधित ठेकेदारने चालू केलेला नाही. या गजबजलेल्या परिसरात रस्त्यामध्ये येणारे पाणी, पर्यायी मार्गाची वाणवा, सुरक्षित वाहतुकीच्या नियोजनाबाबत होणारे दुर्लक्ष व सध्याच्या रस्त्याची दुरवस्था यामुळे येथे दरररोज अपघात होण्याची मलिका सुरु आहे. आज या ठिकाणी तब्बल 17 जण खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. संदीप पाठारी, सुरेश भोईर, प्रीतम निमकर, उमेश जाधव, मना पारोसा आदि सह शाळकरी विद्यार्थी हे येथील रस्त्यातील खड्ड्यांमुळे आज अपघात झाले आहे. या ठिकाणी रहदारी रस्ताच खराब झाल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालाआहे. सध्या याच कामामुळे येथे वाहतुकीची समस्या वारंवार निर्माण होत आहे.   

येथील सरकारी दवाखाना जवळ रस्ता कड़ेला उघडी गटर काम अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडला की लगेच पाणी भरून रस्त्यावर येते. त्यामुळे या ठिकाणी अपघातची मालिका सुरु झाली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच खड्डे पडलेले आहेत. तसेच पोस्ट ऑफिस परिसरातही रस्त्याची चाळण झालेली आहे. या खड्यातून प्रवास करताना वाहन चालकांच्या नाकीनऊ येत आहेत. तक्रार करुनही आजपर्यंत प्रशासनने कुठलाही दखल घेत नसल्याने स्वतंत्र दिन व गुरु पौर्णिमा उत्सव वेळी भाविकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. वर्क आर्डर झालेल्या काँन्क्रीट रस्त्याचे काम सुरु होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नागरिकांडून संताप व्यक्त केला जात आहे.

जुन्या वज्रेश्वरी बायपास रस्ता विकसित केलेला नाही. त्यामुळे मुख्य रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून येथे काहिही नियोजन झालेले दिसत नाही. 

रस्त्यांची परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या पावसाळ्यात येथे काही जानना जीव गमवावे लागणार आहेत. या ठिकाणी वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडी व छोट्यामोठ्या अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने मुख्य रस्त्याची डागडुजी करून खड्डे बुजविण्याचे, रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामाचे तसेच पर्यायी रस्त्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. तयार झालेल्या मुख्य रस्त्यासह मुळ रस्त्यावर पाणी येणे ही समस्या काढणे आवश्यक झाले आहे. याबाबत भिवंडी पंचायत समिती चे कनिष्ठ अभियंता व येथील रस्ता निरीक्षक एल. पवार याना संपर्क साधला असता ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे ही अवस्था झाल्याचे सांगण्यात आले असून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती दिली.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com