अभियंता बलात्कारातील आरोपीस जामीन नाकारला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

तरुणीने वडिलांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी एका मुलीसह सहा जणांना अटक केली होती. मात्र काही दिवसांनी त्या मुलीची सुटका झाली.

मुंबई - पुणे येथे सॉफ्टवेअर अभियंता असलेल्या तरुणीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी शुक्रवारी (ता. 10) उच्च न्यायालयाने मुख्य आरोपी अभिनय साही याचा जामीन नाकारला. सहआरोपी देवरथ दुबे आणि आनंद छानर यांची जामिनावर सुटका केली. 

फेब्रुवारी 2016 मध्ये या घटनेने पुणे शहर हादरले होते. तिघा आरोपींसह पीडित मुलीच्या काही मित्रांचीही चौकशी केली होती. एका प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनीत पीडित तरुणी काम करते. अभिनयही याच कंपनीत होता. ही दोघे कार्यालयाच्या पार्टीला एकत्र गेले असताना ही घटना घडली होती. पीडित तरुणीने अभिनयला याबाबत विचारले असता, फ्लॅटमधील इतर मुलांकडे चौकशी कर असे सांगत त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली होती. त्यानंतर अभिनय आणि त्याच्या मित्रांनी तिला घरी पोचवले. 

तरुणीने वडिलांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी एका मुलीसह सहा जणांना अटक केली होती. मात्र काही दिवसांनी त्या मुलीची सुटका झाली. गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपी अभिजित देबरॉयला जामीन मंजूर केल्याचे साहीचे वकील ऍड. आबाद पौडा यांनी सांगितले. मात्र न्यायालयाने अभिनयला जामीन नाकारला. 

Web Title: bail plea rejected by court in rape case