सार्वजनिक बॅंकांचा 30, 31 ला संप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

मुंबई - वेतनवाढ आणि इतर मागण्यांसाठी येत्या 30 आणि 31 मे रोजी सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंकांमधील सुमारे दहा लाख अधिकारी आणि कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. सलग 48 तासांच्या संपामुळे या काळात बॅंकिंग सेवेवर परिणाम होणार आहे. 

ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनने (एआयबीईए) आज वेतनवाढीसंदर्भातील पुढील आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली. देशभरात 16 मेपासून टप्प्याटप्प्यात आंदोलन केले जाणार आहे. सार्वजनिक बॅंकिंग क्षेत्रातील नऊ संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सकडून इंडियन बॅंक असोसिएशन, अर्थ आणि कामगार मंत्रालयाला निवेदन दिले जाणार आहे. 

Web Title: bank strike