चार वाहने बंद पडल्यामुळे कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

बेलापूर - उरण रोडवरील बेलापूर जंक्‍शन - तरघर या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास तीन अवजड वाहने आणि एनएमएमटीची बस बंद पडल्याने साधारण अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी ती सुरळीत केली.

उरणमधील जेएनपीटी बंदराकडे मोठ्या प्रमाणावर कंटेनर व ट्रेलरसारख्या अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. जेएनपीटीला गुरुवारी पतेतीची सुट्टी असल्याने नेहमीपेक्षा शुक्रवारी या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली होती. असे असताना बेलापूर जंक्‍शन सिग्नलजवळ कंटेनर बंद पडला. त्यामुळे उरणकडील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. त्यानंतर याच रस्त्यावर काही अंतरावर आणखी दोन कंटेनर व एनएमएमटीची बस बंद पडली होती. त्यामुळे येथील वाहतूक कोलमडली होती. अर्ध्या तासानंतर ती सुरळीत झाली, अशी माहिती वाहतूक पोलिस निरीक्षक अभिजित मोहिते यांनी दिली.

Web Title: belapur news traffic

टॅग्स