राहुल गांधींवरील सुनावणी 3 मार्चपर्यंत लांबणीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

संघाच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबद्दलची सुनावणी भिवंडी न्यायालयात सुरू आहे.

मुंबई - महात्मा गांधी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) हत्या केल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी 3 मार्चपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. 

संघाच्या बदनामीप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर आज (सोमवार) भिवंडी न्यायालयात सुनावणी होणार होती. या सुनावणीला राहुल गांधी उपस्थित होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 मार्चला होणार आहे. संघाच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबद्दलची सुनावणी भिवंडी न्यायालयात सुरू आहे.

भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी ते आज सकाळी दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. तेथून ते हेलिकॉप्टरने भिवंडी येथे पोहचले होते. त्यांच्यासोबत काँग्रेस नेतेही हजर होते. राहुल गांधी येथून गोव्याला रवाना झाले आहेत. तेथे ते प्रचारसभा घेणार आहेत.

मुंबई

मुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात "स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र...

02.48 AM

नवी मुंबई -: मतदार आम्हाला निवडून देतात. तेव्हा त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळांवर तुम्ही कशी कारवाई करता, अशा...

02.42 AM

मानखुर्द - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने विविध आगारांतून मोठ्या संख्येने जादा बस...

01.27 AM