दमानियांना भुजबळ यांची नोटीस 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - आर्थर रोड तुरुंगात कैदेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अंजली दमानिया यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस दिली असून, तब्बल 50 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दमानिया यांनी भुजबळ यांना तुरुंगात सर्व सोयीसुविधा मिळत असल्याचा आरोप केला होता. यावर भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेत दमानिया यांनी आपल्याला संपविण्याचे कंत्राट घेतल्याची टीका करत सर्व आरोप फेटाळून लावले होते. चौदा महिने तुरुंगात असताना दमानिया बदनामी करत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता.

मुंबई - आर्थर रोड तुरुंगात कैदेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांनी अंजली दमानिया यांना अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस दिली असून, तब्बल 50 कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दमानिया यांनी भुजबळ यांना तुरुंगात सर्व सोयीसुविधा मिळत असल्याचा आरोप केला होता. यावर भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेत दमानिया यांनी आपल्याला संपविण्याचे कंत्राट घेतल्याची टीका करत सर्व आरोप फेटाळून लावले होते. चौदा महिने तुरुंगात असताना दमानिया बदनामी करत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता. आज भुजबळ यांनी दमानिया यांना कायदेशीर नोटीस बजावली असून, 48तासांत माफी मागा अन्यथा 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. दमानिया अकारण भुजबळ यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. 

Web Title: Bhujbal's notice to Damania