बिहारी शिवसैनिक मुंबईत भाजपविरोधात उतरणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई - पाटणा आणि मुंबई अशी तुलना करत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपने बिहारी जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपविरोधात प्रचारासाठी बिहारी शिवसैनिकांची टीम मुंबईत तळ ठोकणार आहे. बिहार शिवसेनेचे प्रमुख कौशलकुमार शर्मा यांनी "सकाळ'शी बोलताना ही माहिती दिली. आज बिहारमध्ये भाजपच्या विरोधात पाटणा, भागलपूर, खरगपूर, वैशाली, सीतामढी, मुझफ्फरपूर, दरभंगा या ठिकाणी आंदोलनेही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

मुंबईत बिहारी मतदारांची बरीच संख्या आहे. अनेक मतदारसंघांत हे मतदार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असा दावा करत, मुंबई महापालिका निवडणुकीत अकारण बिहारच्या राजधानीचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी रोष ओढवून घेण्याचा प्रयत्न केल्याचे शर्मा म्हणाले. यासाठी बिहारमधील शिवसैनिक मुंबईतल्या बिहारी जनतेत भाजपविरोधात प्रचार करण्यासाठी सज्ज होणार असून, बिहारी मतदारांमध्ये जागृती करतील, असे त्यांनी सांगितले. 

शिवसेनेचे बिहार संपर्कप्रमुख सुनील चिटणीस यांनीही भाजपचे नेते पारदर्शकतेच्या नावाखाली खोटी माहिती सादर करत असल्याची टीका करत पाटण्याचा अवमानकारक उल्लेख केल्याने बिहारी जनतेत रोष असल्याचा दावा केला. मुंबईत बिहारी युवकांनी सोशल मीडियातून याचा निषेध केल्याचे ते म्हणाले. 

मुंबई

कल्याण : गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळ मोठ्या प्रमाणात महाप्रसाद ठेवतात. यावेळी नागरिकांच्या आरोग्याला घातक...

03.36 PM

सफाळे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 4 वर्षे, तर कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला 29 महिने होऊनही सीबीआयपासून...

03.12 PM

ठाणे : सकाळपासुन कोसळत असलेल्या श्रावणसरींनी ठाणे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. ठिकठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटनांसह वृक्ष उन्मळून...

01.03 PM