भाजपचे वर्तन दिवसागणिक ओंगळवाणे - सचिन सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जानेवारी 2017

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे वर्तन दिवसेंदिवस अधिक ओंगळवाणे होत आहे, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे वर्तन दिवसेंदिवस अधिक ओंगळवाणे होत आहे, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मोक्का कायद्याखाली अटक असलेला व जामीनावर सुटका झालेला आरोपी विठ्ठल शेलार याच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले, की नैतिकता, साधनशूचिता, भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षच जाहीरपणे लक्ष्मीदर्शनाच्या गप्पा मारताना दिसतात. मंत्रिमंडळातील 21 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड झाली असतानाही मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालतात. त्याचबरोबर अनेक गुंडांना पक्षात राजरोसपणे प्रवेश देऊन महत्त्वाची पदे आणि प्रतिष्ठा बहाल केली जात आहे. नाशिक येथील कुख्यात गुंड पवन पवार असेल किंवा मुख्यमंत्र्यांसोबत बाबा बोडकेसारख्या कुख्यात गॅंगस्टरचे फोटो असतील, हे सर्व जनतेने पाहिले आहे. त्याचबरोबर अंगाशी आल्यावर सोयीस्करपणे खोटे बोलणाऱ्या भाजपच्या नेत्यांना जनतेने पाहिले आहे.''

'महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असताना आणि नोटबंदीमुळे जनता त्रस्त असताना भाजपच्या कार्यकर्त्यांना पैसे कसे खायचे, हे कळत नाही ही भाजपच्या मंत्र्यांची व्यथा आहे. नोटबंदीच्या संदर्भामध्ये मोठमोठ्या रकमा भाजपच्याच नेत्यांकडे सापडत आहेत. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने अशा सर्व प्रकारांना सत्तेचे संरक्षण लाभत आहे. भाजपच्या या लज्जाहीन प्रकारांचा कॉंग्रेस पक्ष निषेध करीत आहे,'' असे सावंत यांनी सांगितले.

मुंबई

मुंबई - अकार्यक्षम ठरलेल्या "बेस्ट'च्या 550 बस वर्षभरात भंगारात काढल्यानंतर आता 453 बस भंगारात काढण्याचा प्रस्ताव बेस्ट...

04.24 AM

नवी मुंबई  - केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील सर्वांत जास्त प्रदूषित हवा असणाऱ्या 17 शहरांची यादी जाहीर केली...

03.42 AM

मुंबई - हायप्रोफाइल दुहेरी हत्याकांडातील आरोपी चिंतन उपाध्यायने कारागृहात "स्वातंत्र्य' या विषयावर चित्र काढले आहे. ते चित्र...

02.48 AM