भाजपाला जनसंघ नायकांच्या पुण्यतिथीचा विसर

BJP forgets Jan Sangh Nayaks' death anniversaries
BJP forgets Jan Sangh Nayaks' death anniversaries

उल्हासनगर : उल्हासनगरात प्रथमच भाजपाची सत्ता आणि महापौर असताना ज्यांनी जनसंघाची स्थापना केल्यावर पुढे जनसंघाचे रूपांतर भाजपात झाले. ते जनसंघाचे नायक डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्याच पुण्यतिथीचा विसर पडल्याने हारा विनाच अशी स्थिती डॉ.मुखर्जी यांच्या पुतळ्याची झाली.

सध्या भाजपाचे महापौरपद मीना आयलानी आणि शहराध्यक्षपद कुमार आयलानी सांभाळता आहेत. मात्र, त्यांना किंबहूना पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षाचा पाया रचणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यास त्यांच्या पुण्यतिथीस जाऊन साधे पुष्पहार अर्पण करावयासही दिवसभरात वेळ मिळाला नसल्याची टिका मासमीडियावर होऊ लागली आहे.

विशेष म्हणजे डॉ. मुखर्जी यांच्या पुतळ्याच्या स्मारकाच्या उभारणीपासुन त्याच्या सभोवताली प्रचंड घाण, दुर्गंधी, तळीराम, फेरीवाले, गोधड्या आणि कपड्यांचीच वर्दळ दिसते. याबाबत कोणत्याही भाजप नेत्यास खंत नाही .सुदैवाने आणि आज पाऊसरूपात निसर्ग बरसल्याने हा पुतळा धुवून निघाला.

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्यामुळे आक्टोबर 1951 साली भारतीय जनसंघचा उगम झाला. ज्याची परिणती आजच्या भारतीय जनता पार्टीत झाली. मात्र, या त्यागी व्यक्तीच्या बलिदानाला गृहीत धरून पवई चौकात लाखो रुपये खर्च उभारलेल्या आणि ओस पडलेल्या पुतळ्याची स्वच्छता करुन साधा हार टाकण्याची व अभिवादन करण्याची सवड सत्तेतील भाजपाला मिळत नसून त्यांना बलिदानाची पर्वा नसल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप कायद्याने वागा या लोकचलवळीने मासमीडियावर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com