एक डाव सत्तेचा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - मुंबई पालिकेतील महापौर पदाबरोबरच कोणतीही निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बुधवारी शिवसेनेला मतदान करून भाजपने पुन्हा एकदा आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. मात्र, भाजपचा पालिकेतील संन्यास आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार असून, राज्यात एकहाती सत्ता आल्यानंतर पालिकेतील शिवसेनेच्या अस्तित्वाला धक्का दिला जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. त्यावरून आजपासूनच महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक 2019 च्या मे महिन्यात होईल. नोव्हेंबर 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी महापौरपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजप शिवसेनेला अडचणीत आणण्याची शक्‍यता कमीच आहे. मात्र, त्यानंतर एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या सर्व समित्यांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकांत शिवसेनेला भाजप दणका देऊ शकतो. राज्यात भाजपची एकहाती सत्ता आल्यास, वेळ पडल्यास दुसऱ्या पक्षातील नगरसेवक फोडून अथवा मनसेला सोबत घेऊन भाजप अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याच्या हालचाली करू शकतो. अशा शक्‍यतेबाबत आजपासूनच महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त या वेळी कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले असल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत. महापौर शिवसेनेचा असला तरी स्थायी, सुधार, बेस्ट, शिक्षण आदी महत्त्वाच्या समित्या हातून जाणे शिवसेनेला परवडणारे नाही. एका अर्थाने भाजप पालिकेतील शिवसेनेची सत्ताच उलथवून लावण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे; मात्र त्यासाठी राज्यात एकहाती सत्ता येणे आवश्‍यक आहे. 

शिवसेनेला घ्यावी लागणार खबरदारी 
दोन्ही पक्षांना युती करायला लागल्यास पालिकेत शिवसेनेला कोणताही धोका राहणार नाही. भाजपच्या खेळीचा अंदाज शिवसेनेलाही आहे. त्यामुळे आतापासूनच इतर पक्ष भाजपबरोबर जाऊ न देण्याची खबरदारी शिवसेनेला घ्यावी लागणार आहे. 

Web Title: BJP settlement