भाजपने थोतांडे बंद करावीत - उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

भांडुप - भाजपने केवळ हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्याची थोतांडे करण्यापेक्षा अखंड महाराष्ट्र ठेवण्याची, महाराष्ट्राचा एक इंचही तुकडा न तोडण्याची शपथ घ्यावी, असा टोला शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजपला आज भांडुप येथील जाहीर सभेत लगावला. 

भाजपच्या उमेदवारांनी फ्लोरा फाउंटन येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करून प्रचारमोहिमेची सुरवात केली, पण दुसरीकडे भाजपच्या गोटातच वेगळ्या विदर्भाच्या हालचाली सुरू असल्याने ठाकरे यांनी भाजप नेत्यांना वरील टोला लगावला. 

"संयुक्त महाराष्ट्र लढ्यात हुतात्म्यांचे रक्त सांडून मिळवलेल्या महाराष्ट्राचा एकही इंच तोडू देणार नाही. या हुतात्म्यांची शपथ घेऊन आम्ही कामाला सुरवात करू. कारण, त्यांनी सांडलेले रक्त संयुक्त महाराष्ट्रासाठीच आहे, त्यामुळे भाजपनेही अखंड महाराष्ट्राची शपथ घ्यावी, मुंबई आंदण म्हणून मिळाली नसून ती मिळवली आहे,' असेही ते म्हणाले. 
अंगावर आलात तर शिवसेनेच्या वाघाचा छावा तुमचे जलिकट्टू करेल. शिवसेनेच्या अंगावर बिनधास्त या, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले. 

नोटाबंदीचे संकट अजून संपले नाही. अच्छे दिन कब आएँगे? नोटाबंदीमुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला, त्याला कोण जबाबदार? असे प्रश्‍न विचारीत, सामान्य लोकांचे पैसे मारणारे तुम्ही पाकीटमार आहात, असा आरोपही उद्धव यांनी केला. शिवधनुष्य घेतलेला प्रत्येक उमेदवार माझा असून, प्रत्येक वार्डातून शिवसेनाच जिंकणार, यासाठी तुम्ही मला साथ द्या... अशा भावनिक शब्दांची साद त्यांनी घातली. या सभेला उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे, युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, महिला अध्यक्षा संध्या वढावकर, सचिव आदेश बांदेकर, आमदार अशोक पाटील, नगरसेवक रमेश कोरगावकर आदी उपस्थित होते. 

पोलिस बाजूला ठेवा 
गुंडांचा समाचार घेण्यास माझा सैनिक समर्थ आहे, पोलिस बाजूला ठेवा, मग गुंडगिरी काय असते हे कळेल, अशा शब्दांत ठाकरे यांनी मुलुंड येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड लवकरच बंद करू, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. मित्रों... असे म्हणत काही लोक तुमच्याकडे येतील, त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवू नका, मंगळयानाचा खर्च साडेतीनशे कोटी आणि मोदीबाबाच्या जाहिरातीतील फोटोचा खर्च अकराशे कोटी, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली. 

Web Title: BJP should stop - uddhav