दलितांची मते मिळाल्याने भाजपला यश - आठवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 मार्च 2017

मुंबई - उत्तर प्रदेशातील दलित मतदारांनी बहुजन समाज पक्षाला स्पष्ट नाकारले आहे. समाजवादी पक्ष, कॉंग्रेसचाही दारुण पराभव झाला आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशातील दलित मतदारांनी बहुजन समाज पक्षाला स्पष्ट नाकारले आहे. समाजवादी पक्ष, कॉंग्रेसचाही दारुण पराभव झाला आहे.

दलित मतदारांचा कौल भाजपला मिळाल्यानेच हे यश नव्हे; तर महायश भाजपला मिळाले, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी व्यक्त केली. उत्तर प्रदेशातील मतदारांचे आठवले यांनी आभार मानले. आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. उत्तर प्रदेशात भाजपला यश मिळाल्याचे घोषित होताच, आठवले यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. 'उत्तर प्रदेशात दलित मतदारांचा कल महत्त्वपूर्ण असतो आणि या वेळीही दलितांचा कौल महत्त्वपूर्ण ठरला आहे. रिपब्लिकनने भाजपला मतदान करण्याचे केलेले आवाहन आणि मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने भीम ऍप आणि नोटाबंदीच्या घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे भाजपवर दलित मतदारांनी विश्‍वास ठेवला,'' अशी प्रतिक्रिया आठवले यांनी व्यक्त केली.

Web Title: bjp success by dalit voting