प्रत्येक गरिबाला घर हेच भाजपचे स्वप्न - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

घाटकोपर - मुंबईत 60 टक्के लोक झोपडपट्टीत; तर 40 टक्के लोक इमारतीत राहतात. झोपडपट्टीतील गरिबांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचा विकास करणे हीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्पना असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

घाटकोपर पूर्व येथे भाजपच्या वतीने बुधवारी (ता. 28) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. घाटकोपर पूर्व पाईप लाईन व राजावाडीतील पुनर्वसन करण्यात आलेल्या कुटुंबांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चावी वाटप केले. या कार्यक्रमात जनतेसमोर भाजप सरकारच्या दोन वर्षांच्या कामाचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दळणवळण सुविधा आखण्याचा भाजपने संकल्प केला आहे; तसेच रेल्वेचे जाळे पसरून 70 लाखांपेक्षा अधिक लोक रेल्वेतून प्रवास करू शकतील, असे काम येत्या दोन वर्षांत भाजप सरकारकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात नगरसेविका फाल्गुनी दवे, रितू तावडे यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांचा कार्यअहवाल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

Web Title: BJP's dream that every poor house - Minister