व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आशीर्वाद द्या - सत्र न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा शीना बोरा हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीटर मुखर्जीचा अर्ज बुधवारी (ता. 14) मुंबई सत्र न्यायालयाने फटाळला. सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात येत असल्याचे सांगत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाचीला आशीर्वाद द्यावे. त्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सची सोय पोलिसांनी करावी, असे आदेशही न्यालयालयाने दिले.

पीटर मुखर्जी याच्या बहिणीच्या मुलीचे 18 डिसेंबरला लग्न आहे. त्या लग्नाला कुटुंबप्रमुख या नात्याने उपस्थित राहण्याची परवानगी लिखित अर्जाद्वारे मुखर्जीने मागितली होती. यावर सीबीआयचे वकील भरत बदामी यांनी या प्रकरणातील पुराव्यांमध्ये फेरफार होण्याची शक्‍यता व सुरक्षेच्या कारणास्तव पीटर मुखर्जीला बंगळुरुला जाण्याची परवानगी न्यायालयाने नाकारावी, असा युक्तिवाद केला. त्यावर मुंबई सत्र न्यायालयाच्या न्याय कक्षेबाहेर जाण्याची परवानगी मुखर्जीने मागितली आहे. त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांना नियोजन करावे लागेल, असे नमूद करत न्यायाधीश महाजन यांनी विवाह सोहळ्याला जातीने उपस्थित राहण्याची परवानगी नाकारली. त्याऐवजी मुखर्जींसाठी सरकारने तुरुंगाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले. आत्मचरित्र लिहिण्यासाठी लॅपटॉप किंवा इलेक्‍ट्रॉनिक टाईपरायटर उपलब्ध करून देण्याच्या अर्जावर तुरुंगाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

शीना बोरा हत्याप्रकरणी 18 डिसेंबरपासून आरोप निश्‍चितीबाबत युक्तिवाद न्यायालयात सुरू होणार आहे. इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पती संजीव खन्ना या दोघांनी ड्रायव्हर शामलालच्या मदतीने शीनाचा एप्रिल 2012 मध्ये खून करून मृतदेह जंगलात जाळून टाकला होता. या कटात सामील झाल्याचा आरोप पीटर मुखर्जीवर आहे.