भाजपच्या कथित नेत्याने पाठवले अश्‍लील संदेश?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - भाजपच्या महिला नेत्याला अश्‍लील संदेश पाठवणारी व्यक्ती उत्तर प्रदेशमधील भाजपचा कथित नेता असल्याची माहिती पुढे आली आहे. जानेवारी महिन्यापासून तो या महिला नेत्याला अश्‍लील संदेश पाठवत असे.

मुंबई - भाजपच्या महिला नेत्याला अश्‍लील संदेश पाठवणारी व्यक्ती उत्तर प्रदेशमधील भाजपचा कथित नेता असल्याची माहिती पुढे आली आहे. जानेवारी महिन्यापासून तो या महिला नेत्याला अश्‍लील संदेश पाठवत असे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या महिला नेत्याचा वाढदिवस होता. त्या वेळी या व्यक्तीने तिला व्हॉट्‌स ऍपवरून शुभेच्छा दिल्या. मी भाजपचा वाराणसीतील नेता असल्याचे त्याने या महिलेला सांगितले. 7 जानेवारीपासून त्याने व्हॉट्‌स ऍपवर वारंवार संदेश पाठवण्यास सुरुवात केली.

जवळीक साधण्याच्या हेतूने पाठवण्यात आलेल्या या संदेशांकडे या महिला नेत्याने प्रथम दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने अश्‍लील भाषेतील संदेश पाठवण्यास सुरुवात केली. त्या महिलेने ताकीद दिल्यानंतरही तो संदेश पाठवत असे. त्याने या महिलेला 500 च्या आसपास संदेश पाठवले. त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन कराव्या लागलेल्या या महिलेने त्याच्याविरोधात सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी भा.दं. संहिता व माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला. तंत्रज्ञानाचा वापर करत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: blue message send by bjp leader