Potholes
Potholes

β काम नाही करायचं? खुश्‍शाल राजीनामा द्या..!

मुंबई महापालिकेला सध्या माध्यमांनी धारेवर धरले आहे. ‘शहरात केवळ 34 खड्डे आहेत‘ असे विधान केल्यावर दुसरं काय करणार? साऱ्या मुंबईचा प्रवास खड्ड्यांतून वाहत असताना माध्यमांनी गप्प बसायला हवं, असंच बहुदा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत असावं. म्हणूनच ‘आम्ही राजिनामे देऊ, आंदोलन करू‘ अशा धमक्‍या हे अधिकारी द्यायला लागले आहेत. खरंतर ‘खुश्‍शाल राजिनामे द्या‘ असंच मुंबईकरांनी आता या अधिकाऱ्यांना सांगायला हवं. 

काही वर्षांपूर्वी मी स्वत: ‘सकाळ‘साठी पुणे महानगरपालिकेचे बीट कव्हर करत होतो. त्यावेळी पुण्यातही खड्ड्यांची अशीच परिस्थिती होती. त्यामुळे ‘पुणं गेलं खड्ड्यात‘ अशा लोगोसह ‘सकाळ‘ने महापालिकेला आणि सत्ताधाऱ्यांना झोडून काढलं होतं. त्यावेळी सत्तेत असलेल्यांना महापालिकेच्या सत्तेवर निवडणुकीत पाणी सोडावं लागलं. त्यानंतरच्या वर्षातही पावसाळ्यात खड्ड्यांची परिस्थिती तशीच राहिली. त्यावेळी ‘सकाळ‘ खड्ड्यांच्या बातम्या आणि फोटो प्रसिद्ध करत होता. त्यावेळीही ‘या बातम्या वाचून आम्हाला रक्तदाबाचा त्रास होतो,‘ असा कांगावा इथल्या अधिकाऱ्यांनी सुरू केला होता. त्याच काळात नगर रस्त्यावर वर उखडून आलेल्या मॅनहोलच्या झाकणावरून घसरून एक दुचाकीस्वार महिला बसखाली आली आणि तिचा मृत्यु झाला. त्या मॅनहोलचा फोटो आणि बातमी ज्या दिवशी प्रसिद्ध झाली, त्याच सायंकाळी महापालिकेचे 50-60 अभियंते मोर्चाच्या आवेशात ‘सकाळ‘ कार्यालयात आले आणि या बातम्यांबद्दल त्यांनी तक्रार केली होती. परिणाम काही झाला नाही; पण असं करायचा धीर मात्र अधिकाऱ्यांना आला होता, हे नक्की! हे सारे संघटीत शक्तीच्या जोरावर चालले होते. 

आज मुंबईतही हीच संघटीत शक्ती काम करताना दिसत आहे. ‘आम्ही कसेही वागू; मीडियाने गप्प बसायचे‘ असाच संदेश बहुदा त्यांना यातून द्यायचा आहे. खरंतर, ‘ज्यांच्यावर महापालिकेची जबाबदारी आहे, त्या राजकीय पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील‘, ‘गेले तर ते जातील; आम्ही इथेच असू‘ असे बहुता संपाच्या-राजीनाम्याच्या धमक्‍या देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांना सुचवायचे असावे. 

पण आता खरंच.. तुम्ही जा! जनतेनंच त्यांना असं सुनवायला हवं.. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या राजधानीला अशी ‘हम करे सो..‘ वृत्ती परवडणारी नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com