विरोधी पक्षनेतेपदाचा महापालिकेत पेच कायम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

मुंबई - मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा कायम असून, त्याबाबत कायदेविषयक सल्ला अद्याप महापौरांनी घेतलेला नाही. त्यामुळे या पदाचा पेच निर्माण झाला आहे. पालिकेचे सभागृह सध्या विरोधी पक्षनेत्याविना चालवले जात आहे. 

भाजपने पालिकेतील कोणत्याही पदावर दावा न करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेला महापौरपदासाठी भाजपने पाठिंबा जाहीर केला. विरोधी पक्षनेतेपदही न स्वीकारण्याचा निर्णय भाजपने जाहीर केल्यामुळे विरोधी पक्षनेता कोण, असा पेच पालिकेत निर्माण झाला आहे. पालिकेच्या कायदा विभागाचे मत अजूनही महापौरांकडे आलेले नाही. मात्र भाजपने माघार घेतल्याने कॉंग्रेससाठी विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. कॉंग्रेसचे गटनेते रवी राजा हे विरोधी पक्षनेतेपदाचे दावेदार ठरू शकतात. मात्र महापौरच या पेचातून मार्ग काढू शकतात. त्याबाबत कायदेशीर मत त्यांनी मागितल्याचे समजते. पुढच्या पालिकेच्या सभागृहात त्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: BMC opposition leader issue

टॅग्स