मुंबईच्या घाण पाण्यातून पालिका शोधणार कोरोना व्हायरस

मुंबईच्या विविध भागांतून घेतले जाणार पाण्याचे हजार नमुने
Coronavirus
Coronavirus Sakal

मुंबई : कोविडची रुग्णसंख्या (corona patients) आता नियंत्रणात आली असली तरी अजूनही विषाणूवर (corona virus) लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मुंबई पालिका (bmc) त्यासाठीच सांडपाण्याचे निरीक्षण करून त्यातून कोरोना विषाणू शोधणार आहे. त्यासाठी मुंबईच्या विविध भागांतून पाण्याचे एक हजार नमुने (one thousand sample) घेतले जाणार आहेत. पालिका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यापासून त्याच्या चाचण्या (corona test) सुरू केल्या जाणार आहेत.

Coronavirus
उल्हासनगरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार

मुंबईच्या वेगवेगळ्या विभागांतील पम्पिंग स्टेशन आणि मॅनहोलमधील सांडपाणी तपासणीसाठी घेतले जाणार आहे. असे एकूण एक हजार नमुने घेतले जातील. त्यांचे आधी आरटीपीसीआर आणि जिनोम सिक्वेन्सिंग केले जाईल, अशी माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे रुग्ण आता नियंत्रणात आहेत. तरीही विषाणूवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. सांडपाण्याच्या निरीक्षणातून आपल्याला विषाणू अजूनही कुठे आहे की नाही याची माहिती होईल. असलाच तर तो किती तीव्रतेचा आहे हे समजण्यासही मदत होईल.

जिनोम सिक्वेन्सिंगसाठी कमीत कमी ३५० नमुने लागतात. त्यातही ते पॉझिटिव्ह असतील तर जिनोम सिक्वेन्सिंगसाठी घेतले जातात. त्यामुळे जास्तीत जास्त नमुने गोळा करण्याचा प्रयत्न आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

असा असेल प्रकल्प

कोविड बाधित किंवा विषाणू शोधण्यासाठी आधी रुग्णांचे नमुने घेतले जात होते. आता मुंबईतील विविध भागांतून सांडपाण्याचे नमुने घेतले जाणार आहेत. पाण्यात कोरोनाचे विषाणू आहेत की नाही हे तपासण्यासाठी नमुन्याची आरटीपीसीआर केली जाईल. त्यात एखादा नमुना पाॅझिटिव्ह आढळला तर त्याचे जिनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. त्याआधारे पाण्यात कोविड विषाणू आहे की एखादा व्हेरिएंट याचा शोध घेता येईल.

पुढची दिशा ठरवण्यास मदत

सांडपाण्याचे जिनोम सिक्वेन्सिंग केल्यानंतर जर विषाणू आढळला तर पुढील दिशा ठरवताना त्याची मदत होईल. म्हणजे उपचार काय, प्रतिबंधात्मक आणि धोरणात्मक उपाययोजना काय करता येईल, तयारी काय असावी, आदी बाबी ठरवण्यात मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com