पुण्यातील व्यक्तीचा मृतदेह सापडला मुरबाडच्या जंगलात

नंदकिशोर मलबारी
रविवार, 22 एप्रिल 2018

मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील न्याहाडी गावच्या जंगलात एक मृतदेह सापडला आहे.

सरळगांव (ठाणे) - मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील न्याहाडी गावच्या जंगलात एक मृतदेह सापडला आहे. माळशेज जवळील महामार्ग 61 वरील मुरबाड तालुक्यातील न्याहाडी गावच्या जगलांमध्ये बेवारस प्रेत असल्याची माहिती प्रथम टोकावडे पोलिसांना स्थानिक पोलिस पाटील देशमुख यांनी कळवली.

माहिती मिळताच, घटनास्थळी टोकावडे पोलिसांनी जाऊन मयताची ओळख पटण्यासाठी शोधाशोध केली आसताना मयत निलेश पोपटराव भुजबळ असे नाव आढळून आले. मयत व्यक्ती तळेगाव ढमधरे (पुणे) येथील असुन त्या व्यक्तीचे वय 35 आहे.

मयतला सात ते आठ दिवस झाले असल्यामुळे प्रेत कमकुवत बनले आहे. शवविच्छेदन व अधिक तपासासाठी टोकावडे ग्रामीण रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आले आहे. या मयताबाबत अधिक तपास सहाय्यक पो.नि.धनजंय पोरे, सागर चौव्हान, ननावरे, विशे, पाखरे, कोकाटे, पारधी व इतर करत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

    

Web Title: body of a man in Pune found in Murbad forest