भिवंडीत सीमकार्डसाठी बोगस कागदपत्रे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

भिवंडी - टेलीनॉर मोबाईल कंपनीचे सीमकार्ड देताना जास्त पैसे घेऊन अन्य व्यक्तीचे आधारकार्ड व मतदार ओळखपत्राचा वापर करणारे तीन वितरक आणि दोन पडताळणी अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

कलीमुद्दीन ईस्माइल खान, संदीपकुमार भगवानदास गुप्ता, अनिल सिंह, बंडू भाकरे, गणेश नेलवाडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील स्वप्नील पाटील हा मुख्य सीम वितरक असून, तो फरारी आहे. त्याने कल्याण रोड येथे ओमसाई कनेक्‍टिव्हिटी, संदीपकुमार याने कामतघर येथे शुभम इंटरप्रायजेस, तर कलीमुद्दीन याने कारीवली रोड येथे गॅलेक्‍सी मोबाईल दुकानांमधून टेलीनॉर मोबाईल कंपनीच्या सिमकार्डची विक्री केली. कंपनीचे पडताळणी अधिकारी भाकरे व नेलावडे यांनी बोगस कागदपत्रांना मान्यता दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले. त्यासाठी ग्राहकांकडून जास्त पैसे घेण्यात आले. 

शहरात टेलीनॉर कंपनीचे 27 वितरक असून, त्यांच्यामार्फत 460 सिमकार्ड जारी केली आहेत. या सर्व वितरकांनी आपली दुकाने बंद केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणाचा पुढील तपास भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रकाश पाटील करत आहेत. 

मुंबई

कल्याण - नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात गेलेली मराठी कुटूंब आजही आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत....

06.24 PM

मुंबई : घाटकोपर येथील इमारत दुर्घटना प्रकरणाची चौकशी करून संबंधित अहवाल आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर...

04.30 PM

मुंबई - वर्षभर आपले कुटुंबिय आणि देशासाठी लढणाऱ्या आपल्या पती राजांची आणि कुटुंबियांची सक्षम पणे सांभाळ करणाऱ्या त्या पत्नी...

04.24 PM