बॉम्बच्या अफवेने नकाराचा बदला 

बॉम्बच्या अफवेने नकाराचा बदला 

मुंबई - लग्नास नकार दिलेल्या परदेशी महिलेवर सूड उगवण्यासाठी तिच्याकडे बॉम्ब असल्याची ‘खबर’ विमानतळ पोलिसांना देणाऱ्या २८ वर्षीय तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. 

येमेनची नागरिक असलेली महिला बॅगेत बॉम्ब घेऊन विमानतळ आवारात प्रवेश करत असल्याचा दूरध्वनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळाच्या नियंत्रण कक्षात आला. सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. शनिवारी पहाटे पाच वाजताचे येमेनला जाणारे विमान पकडण्यासाठी दोनच्या सुमारास ती विमातळावर पोहोचताच सुरक्षा यंत्रणांनी तिची तासभर चौकशी केली. त्यातून हाती काहीच लागले नाही. अखेर या महिलेने आरोपी तरुणाने पाठवलेला संदेश यंत्रणांना पाठवल्यानंतर सर्व प्रकार स्पष्ट झाला. ‘मला सोडून गेल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी त्याने या संदेशात दिली होती. सहार पोलिसांच्या मदतीने मोहम्मद अली रोडवरील घरातून कुतुबुद्दीन हातीमभाई शाहीवाला याला ताब्यात घेतले. लग्न जुळवण्याच्या एका संकेतस्थळावर त्याची या महिलेसोबत ओळख झाली होती. तिच्या वडिलांवर उपचार सुरू असल्यामुळे ती मुंबईत आली होती. शाहीवाला हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. 

श्रीमंतीचा बनाव
मुंबईत ही महिला शाहीवाला यास भेटल्यावर त्याने दावा केल्याप्रमाणे तो श्रीमंत नसल्याचे तिच्या लक्षात आले. त्याचा कोणताही उद्योगधंदा नसल्याने तिने लग्नाला नकार देऊन येमेनला परतण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com