बोनी कपूर यांचे ट्‌विटर हॅंडल हॅक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

मुंबई - प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूर यांचे ट्‌विटर हॅंडल हॅक झाले आहे. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली आहे. सायबर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात बुधवारी गुन्हा दाखल केल्याची माहिती उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी दिली. आरोपीने कपूर यांचे ट्‌विटर हॅंडल हॅक करून त्यांच्या परिचित व्यक्तींकडे उसने पैसे मागण्यास सुरवात केली. याबाबतची माहिती कपूर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पासवर्ड बदलला आणि पोलिसांकडे तक्रार केली.