बोर्डी - पोलिसांनी छापा मारलेल्या जुगाराच्या अड्ड्याचा संबंध रामवाडी मित्र मंडळाशी

बोर्डी - पोलिसांनी छापा मारलेल्या जुगाराच्या अड्ड्याचा संबंध रामवाडी मित्र मंडळाशी

बोर्डी -  पालघर जिल्हा पोलिसांनी सोमवार दिनांक 24 रोजी पहाटे हॉटेल पिंक लेकमध्ये छापा मारुन अटक केलेल्या आरोपींमध्ये रामवाडी मित्र मंडळाचा अध्यक्ष शेखर सहामते याला अटक झाल्यामुळे या जुगाराच्या अड्ड्याचा संबंध रामवाडी मित्र मंडळाशी जोडला गेला आहे. सहामते हा डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांचा निकटवर्तीय असून राजपूत यांच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या रामवाडी मित्र मंडळाचा तो डमी अध्यक्ष आहे. या मंडळाच्या गणेशोत्सवासाठी आवश्यक त्या परवानग्या शेखर सहामते याच्या नावावर घेतल्या जातात. या आधी रामवाडी मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात पोलीसांनी छापा मारुन जुगारींना अटक केली होती. त्यानंतर अन्यत्र जुगार खेळवला जात असल्याची अटकळ मानली जात होती. आजच्या छापेमारी नंतर चित्र स्पष्ट झाले आहे. नव्या पोलीस अधिक्षकांनी जुगाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर भरत राजपूत यांच्या मंडळात जुगार खेळवला जाणार नसल्याचे संकेत होते. मात्र सहामतेच्या अटकेने संशयाचे बोट रामवाडी मित्रमंडळाकडे रोखले गेले आहे.

आज अटक करण्यात आलेल्या जुगारींची नावे पुढीलप्रमाणे : शेखर सदानंद सहामते, निलेश मोहनलाल शहा उर्फ किकू, अमर रविंद्र भानुशाली, जितेन्द्र गजानन चंपानेरकर, इम्रान कमृद्दीन तांबोळी, प्रताप रत्नाकर, राजेश परशुराम पागधरे, रामदास उर्फ झिपू झावरे, शंकर गोपाळ शेट्टी, संतोष मेवालाल सोनकर, अफ्रोज निशाद खान, रविंद्र रमाकांत नाईक, संतोष शंभुलाल खत्री, महेश हणमंत वाघमारे, आनंद लक्ष्मण पुजारी, रोहिदास मंगाराम कुमावत, झुबिन दारा संजाणीया, बब्लू रामबालक चव्हाण, राजेश किशोर धोडी, इद्रिस गफूर खाटीक, रघुनाथ बबला माच्छी. या शिवाय हॉटेलच्या २ वेटर्सना आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांना आज डहाणू येथील प्रथम वर्ग न्यायालय

इद्रिस गफूर खाटीक, रघुनाथ बबला माच्छी. या शिवाय हॉटेलच्या २ वेटर्सना आरोपी करण्यात आले आहे. या सर्वांना आज डहाणू येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com