इमारतींमध्ये एक लाख बेकायदा बदल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

मुंबई - मुंबईच्या इमारतींच्या 360 अंशात झालेल्या सर्वेक्षणात तब्बल एक लाख बेकायदा बदल आढळून आले आहेत. या बेकायदा बदलांपोटी दंड तसेच मालकांना दुप्पट मालमत्ता कर भरावा लागणार आहे. काही दिवसांत याबाबतच्या नोटिसा पाठविण्यास महापालिका सुरुवात करणार आहे. शहरातील मालमत्तांची नोंद व्हावी म्हणून महापालिकेने लाईट डिटेक्‍शन ऍण्ड रेजिंग "लिडार' तंत्रज्ञांच्या आधारे सर्वेक्षण केले.
Web Title: building illegal changes

टॅग्स