कॉलसेंटरचा वापर रात्री फसवणुकीसाठी 

कॉलसेंटरचा वापर रात्री फसवणुकीसाठी 

मुंबई - कॉलसेंटरद्वारे फसवणूकप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केलेला मुख्य आरोपी डेव्हिड अल्फान्सो याने ते कॉलसेंटर भाड्याने घेतले होते. या कॉलसेंटरचा मूळ मालक सकाळी सामान्य कॉल सेंटरप्रमाणे काम करायचा; पण डेव्हिड हीच यंत्रणा संगणकातील व्हायरस काढण्याच्या नावाखाली रात्री परदेशी नागरिकांना गंडा घालण्यासाठी वापरीत होता, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. 

विशेष माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्या कक्ष-9च्या पोलिसांनी एस. व्ही. रोड येथील या कॉलसेंटरवर छापा टाकला. त्या वेळी 38 जण व्हीओआयपी दूरध्वनी करून अमेरिकेतील नागरिकांना गंडा घालत असल्याचे लक्षात आले. काम करणाऱ्या या प्रत्येक व्यक्तीला डेव्हिड 20 हजार रुपये मासिक वेतन देत होता. 

याच परिसरात "इनोव्हेशन 360' दुसरे एक कॉल सेंटर याच प्रकारे परदेशी नागरिकांच्या फसवणुकीसाठी वापरले जात होते. भाड्याने घेतलेल्या या कॉलसेंटरमध्ये आरोपी वापरत असलेले सॉफ्टवेअर पासवर्डद्वारेच उघडत होते. त्यामुळे सकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्री चालणारे फसवणुकीचे प्रकार कळू शकत नव्हते. याप्रकरणी शनिवारी बिपीन साहू याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. तो मिरा रोडचा रहिवासी आहे. आरोपींनी नुकतीच ही कॉलसेंटर सुरू केली होती. त्यातून त्यांनी मोठी कमाई केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com