दिव्यात पेटणार प्रचाराचा वणवा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

डोंबिवली - ठाणे महानगरपालिका निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांना महत्त्व दिले गेले आहे. यंदाच्या निवडणुकीत दिवा परिसरातील प्रभागांची संख्या दोनवरून 11 वर पोहचल्यामुळे शिवसेना, भाजप आणि त्यापाठोपाठ मनसेने येथे प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची विशेष सभा दिव्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती भाजप आणि मनसेच्या विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

आजवरचा इतिहास पाहता ठाणे महापालिका निवडणुकीसाठीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सर्व महत्त्वाच्या सभा ठाणे शहरात होत होत्या; मात्र दिव्यातील वाढलेल्या प्रभागांची संख्या लक्षात घेता राजकीय पक्ष या ठिकाणी अधिक लक्ष देत आहेत. सत्तास्थापनेसाठी येथील मतदार आता महत्त्वाची भूमिका बजवणार असून सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होण्यासाठी दिव्यात पक्षाचा उजेड पाडणे आवश्‍यक असल्याचे राजकीय पक्षांनी जाणले आहे. दिव्यात जाहीर सभेसाठी एक खासगी मैदान असून या मैदानावरच दोन्ही नेत्यांच्या सभा होणार आहेत. 

दिव्याचे वाढलेले महत्त्व पाहता ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीमधील विशेषतः शिवसेना आणि भाजपचे नेते दिव्यात तळ ठोकून आहेत. शेजारील मुंब्रा आणि कळव्यात राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व असल्याने दिव्यातून अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा भाजपचा मानस आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचा चांगला परिणाम झाला होता. दिव्यातही तसा प्रयोग करून मतांचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने खास दिव्याच्या आखाड्यात थेट मुख्यमंत्र्यांनाच उतरवण्याचे ठरवले आहे. 

दिव्यात जाहीर सभा घेणारे देवेंद्र फडणवीस हे पहिलेच मुख्यमंत्री असतील. शनिवारी (ता.11) दिव्यात मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी येणार असून सभेची तयारी सुरू आहे. 
- शिवाजी आव्हाड, कल्याण जिल्हा सरचिटणीस, भाजप. 

दिव्यात राज ठाकरे यापूर्वीही आले आहेत; मात्र अद्याप त्यांची जाहीर सभा येथे झाली नव्हती. यंदा मनसेच्या प्रचारासाठी दिव्यात राज यांची सभा आयोजित करण्याबाबत बोलणी सुरू आहेत. लवकरच तारीख निश्‍चित होईल. 
- राजू (प्रमोद) रतन पाटील, मनसे सरचिटणीस. 

Web Title: campaigning in diva