पाच दुकानात चोरी करणारी टोळी सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Capture gang in five stores with help of CCTV camera
Capture gang in five stores with help of CCTV camera

उल्हासनगर : पाच दुकानांचे शटर उचकटून त्यातून किमती सामान लंपास केल्याची घटना काल (मंगळवार) घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. त्यांचे चेहरे ओळखता येणारे असल्याने लवकरच या टोळीला बेड्या ठोकण्यात येतील, असे हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम पलंगे यांनी सांगितले. 

ही पाच दुकाने कॅम्प नंबर 5 मधील मठ मंदिर, मच्छी मार्केट परिसरात आहेत. मंगळवारच्या मध्यरात्री सर्वत्र शुकशुकाट असताना चार तरुण दुकानांचे शटर उचकटून त्यातील किमती इलेक्ट्रॉनिक वस्तू, जिन्स पॅन्ट चोरून नेत असल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामुळे चव्हाट्यावर आला आहे. सकाळी व्यापाऱ्यांच्या हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्यावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बच्चाराम रुपचंदानी, नगरसेवक सतरामदास जेसवानी, किशोर वनवारी आणि हिललाईन ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पाच दुकानातून किती रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला, याचा पंचनामा करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात चोरावर गुन्हा दाखल झाला असून, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेले चेहरे कोणत्या परिसरातले याचा शोध घेऊन त्यांना गजाआड केले जाणार असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम पलंगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com