दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त दोन गुण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - सीबीएसई दहावीच्या इंग्रजी विषयात विद्यार्थ्यांना अतिरिक्त दोन गुण मिळणार आहेत. शुक्रवारी याबाबतचा अंतिम निर्णय सीबीएसई बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केला. दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर 12 मार्चला घेण्यात आला. या प्रश्‍नपत्रिका छपाईत चुका झाल्याची तक्रार पालक व विद्यार्थ्यांनी केली होती. प्रश्‍नपत्रिकेतील परिच्छेदातील काही शब्दांचे समानार्थी शब्द शोधण्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते; परंतु या परिच्छेदातच टायपिंगच्या चुका असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. या तक्रारीत तथ्य असल्याचे सीबीएसईच्या वतीने सांगण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित प्रश्‍न सोडवला आहे, त्यांना दोन गुण अतिरिक्त दिले जातील, असे सीबीएसईने सांगितले.
Web Title: CBSE Board ssc student english subject extra two marks