भरपाईवाढीचा प्रस्ताव केंद्राला पाठविणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - अतिवृष्टीत नुकसान झालेल्या घरांची भरपाई ही केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे देण्यात येते. या रकमेत वाढ करण्याचा किंवा या कुटुंबांचा पंतप्रधान आवास योजनेत समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत सांगितले.

रायगड जिल्ह्यातील चांगेवाडी या आदिवासी वाडीतील पूरग्रस्त कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भातला प्रश्‍न विधानसभा सदस्य मनोहर भोईर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कांबळे बोलत होते. कांबळे पुढे म्हणाले की, 18 जुलै 2016 रोजी अतिवृष्टीमुळे तीन कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे. त्यांना नियमाप्रमाणे प्रति घर 5200 रुपये मदत देण्यात आली आहे. या रकमेत वाढ व्हावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. याचा विचार करून या रकमेत वाढ करावी किंवा या कुटुंबांचा पंतप्रधान आवास योजनेत समावेश करावा, असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल.

Web Title: From the Center's proposal to increase compensation