मध्य, हार्बरवर उद्या मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - रुळांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मध्य तसेच हार्बर मार्गावर रविवारी (ता.26) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. 25) मध्यरात्री दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई - रुळांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मध्य तसेच हार्बर मार्गावर रविवारी (ता.26) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकांदरम्यान शनिवारी (ता. 25) मध्यरात्री दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे
- कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 11.15 वाजल्यापासून दुपारी 4.15 वाजेपर्यंत ब्लॉक
- त्यामुळे सकाळी 10.41 वाजल्यापासून दुपारी 4.14 वाजेपर्यंत धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.
- या लोकल ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा, कळवा स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर मार्ग
- सीएसटी-चुन्नाभट्टी /माहीम स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेने सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक
- त्यामुळे सीएसटी ते पनवेल दरम्यानची लोकलसेवा सकाळी 11.21 वाजल्यापासून दुपारी 4.39 वाजेपर्यंत बंद असेल.
- पनवेल ते सीएसटी दरम्यानची वाहतूक सकाळी 9.52 वाजल्यापासून 3.26 वाजेपर्यंत बंद असेल.
- प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेलदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.
- सीएसटी ते वांद्रे/ अंधेरी दरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक सकाळी 10.38 वाजल्यापासून दुपारी 4.43 पर्यंत बंद असेल.

पश्‍चिम रेल्वे
- मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ दरम्यान धीम्या मार्गावर शनिवारी (ता.25) मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम
- याकाळात सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील.
- या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, एल्फिन्स्टन रोड व माटुंगा रोड स्थानकांत थांबणार नाहीत.
- लोअर परळ, माहीम जंक्‍शन, खार रोड स्थानकातील फलाटाच्या कमी लांबीमुळे लोकल दोन वेळा थांबवण्यात येतील.

Web Title: central harbour megablock