मध्य, हार्बरवर रेल्वेचा मेगाब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

पश्‍चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत राहणार
मुंबई - केवळ मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वेच्या वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्रीपासून विशेष मेगाब्लॉक घेण्यात येत असला तरी तो रविवारी पहाटेपर्यंत संपणार आहे.

पश्‍चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत राहणार
मुंबई - केवळ मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्‍चिम रेल्वेच्या वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्रीपासून विशेष मेगाब्लॉक घेण्यात येत असला तरी तो रविवारी पहाटेपर्यंत संपणार आहे.

मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक
ठाणे ते कल्याणपर्यंतच्या धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या वेळेत मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान लोकल जलद मार्गावरून धावतील. सकाळी 10.20 ते दुपारी 2.42 दरम्यान सीएसटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप व मुलुंड स्थानकावर थांबतील. सकाळी 11.22 ते दुपारी 3.28 दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर व कुर्ला येथे थांबतील. दुरुस्तीच्या कामांमुळे लोकल 10 ते 15 मिनिटे उशिरा धावतील.

हार्बर मार्ग
कुर्ला ते वाशी या दोन्ही मार्गांवर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30पर्यंत दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येतील. या वेळेत सीएसटी ते पनवेल-बेलापूर-वाशीहून सुटणाऱ्या सर्व लोकल बंद राहतील. सीएसटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील. या मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पश्‍चिम रेल्वे
या मार्गावर रविवारचा नियमित मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. फक्त वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यान दोन्ही मार्गांवर शनिवारी (ता. 16) मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.15 पर्यंत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान, बोरिवली-वसई रोड ते विरार या दोन्ही मार्गांवरील धीम्या लोकल जलद मार्गावरून चालविण्यात येतील.

मुंबई

कल्याण : 'मूलभूत सुविधा नसलेल्या आगारातून काम करण्याची जबरदस्ती केली, तर कल्याण डोंबिवली महानगर परिवहन उपक्रमाचे कर्मचारी...

06.18 PM

मुंबई : 'सरकार तो उसे मारनेपर तुली थी.. कोर्ट उसे क्‍या सजा देग; अल्लाहने उसे इन्साफ दिया; मेरे भाई को जन्नत नसीब हुई' असा आक्रोश...

04.00 PM

मुंबई : भायखळा कारागृहात चार दिवसांपूर्वी आकस्मिक मृत्यू झालेल्या कैदी मंजुळा शेट्ये यांच्यावर पोलिसांनी लैंगिक...

02.36 PM