मध्य रेल्वेवर फुकटे वाढले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - मध्य रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेत यंदा फुकटे प्रवासी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांकडून 153 कोटी 82 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षात 19.58 टक्के वाढ झाली आहे.

विनातिकीट व अनियमित प्रवास, क्षमतेपेक्षा जादा सामान अशा एकूण 31 लाख 45 हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. 2016-17 या वर्षात 26 लाख 88 हजार प्रकरणांची नोंद झाली होती. तसेच दंड म्हणून 128 कोटी 63 लाख रुपये वसूल करण्यात आले होते. मार्च 2018 मध्ये आरक्षित प्रवासी तिकीट हस्तांतराच्या 199 प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यातून एक लाख 81 हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

Web Title: central railway free travel passenger fine crime