मध्य रेल्वेच्या मार्गावर 'थर्टी फर्स्ट' स्पेशल सेवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मुंबई - नववर्षाच्या स्वागतासाठी मध्य रेल्वेही सज्ज झाली आहे. मुंबईतील नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि पनवेलदरम्यान "थर्टी फर्स्ट'च्या रात्री चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण स्पेशल ही सीएसएमटी स्थानकावरून रात्री 1.30 वाजता सुटून कल्याणला मध्यरात्री 3 वाजता पोचेल. सीएसएमटी स्पेशल ही कल्याणहून रात्री 1.30 वाजता सुटून सीएसएमटीला मध्यरात्री 3 वाजता पोचेल. हार्बर मार्गावर पनवेल स्पेशल सीएसएमटीहून रात्री 1.30 वाजता निघेल. ती मध्यरात्री 2.50 वाजता पनवेलला पोचेल. सीएसएमटी स्पेशल ही पनवेलहून रात्री 1.30 वाजता निघेल आणि सीएसएमटीला मध्यरात्री 2.50 वाजता पोचेल.

Web Title: central railway's special service on new year