चंद्रपूर, लातूर व परभणीत 19 एप्रिलला मतदान

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई - चंद्रपूर, लातूर व परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 19 एप्रिल 2017 रोजी मतदान होणार असून 21 एप्रिलला मतमोजणी केली जाईल. त्यासाठी संबंधित महानगरपालिका क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

भिवंडी महापालिकेची मुदत संपण्यास अवकाश असल्याने आणि पनवेल महापालिकेच्या निवडणुकीची तयारी अपूर्णावस्थेत असल्याने या दोन्ही निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तवली. सहारिया म्हणाले, 'मुदत समाप्तीपूर्वी या महानगरपालिकांच्या निवडणुका घेणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेची 29 एप्रिल, परभणीची 15 मे तर लातूरची 20 मे रोजी मुदत संपत आहे. नामनिर्देशनपत्रे 27 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत सादर करता येतील. 28 मार्चला गुढी पाडव्याची सुटी असल्याने त्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. परंतु, रविवारी (ता. 2) ती स्वीकारण्यात येतील.

दरम्यान, सांगली- मीरज- कुपवाडला प्रभाग क्र. 22 ब, जळगावला प्रभाग क्र. 24 अ आणि कल्याण- डोंबिवलीत प्रभाग क्र. 46 च्या रिक्तपदासाठीदेखील 19 एप्रिल रोजी मतदान होईल. तसेच धुळे जिल्हा परिषदेच्या शिरूड (ता. धुळे) आणि अकोला जिल्हा परिषदेच्या दानापूर (ता. तेल्हारा) निवडणूक विभागाच्या; तर अकोट (जि. अकोला) पंचायत समितीच्या कुटासा निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठीदेखील 19 एप्रिलला मतदान होणार आहे.

Web Title: chandrapur latur parbhani municipal election