चंद्रपूर जिल्ह्यात वडील रागावल्याने किशोरवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

वडील रागावल्याने एका शालेय विद्यार्थ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.

चिमूर (जि. चंद्रपूर) - वडील रागावल्याने एका शालेय विद्यार्थ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.

येरखेडा (खापरी) येथे आज (गुरुवार) अमित किसना देहाळे (वय 18) याचे वडिलांशी क्षुल्लक कारणावरून वाद झाले होते. दरम्यान राग अनावर झाल्याने रागाच्या भरात अमितने स्वत:च्याच शेतात आज सकाळी आठच्या सुमारास झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केली. तो चिमूर येथील नेहरू विद्यालयात बारावीत शिकत होता. घटनास्थळाचा पोलिस पंचनामा करुन मृतदेहाचे चिमूर येथील रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर येरखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. क्षुल्लक कारणामुळे आत्महत्या केल्याचा घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.