उल्हासनगरकडे बघण्याचा निगेटिव्ह दृष्टिकोन बदल : धनंजय बोडारे

shivsena
shivsena

उल्हासनगर : आज उल्हासनगरातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात जागतिक-भारतीय-महाराष्ट्र पातळीवर भरारी घेतली आहे. गुगल, सी.ए, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा पास करण्याचा करिष्मा केला आहे. महाराष्ट्रातील इतर शहराच्या तुलनेत हे मोठे यश उल्हासनगरने मिळवले असतानाही या शहराकडे बघण्याचा निगेटिव्ह दृष्टिकोन बदलतच नाही. हे खरच दुर्दैव असून यापुढे निगेटिव्ह दृष्टिकोन बदलण्याचे आणि पॉझिटिव्ह दृष्टिकोनातूनच बघण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी केले.

कालरात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेनेच्यावतीने प्राईम सभागृहात जागतिक-भारतीय-महाराष्ट्र पातळीवर शिक्षण क्षेत्रात भरारी घेणाऱ्या किंबहूना ठसा उमटवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जाहीर गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोडारे यांनी वरील आवाहन करताना निगेटिव्ह दृष्टीकोनाच्या मानसिकतेचा समाचार घेतला.

सीएच्या परीक्षेत देशात तिसरी व महाराष्ट्रात प्रथम आलेली समिक्षा अग्रवाल, वडील हयातीत नसताना प्रतिकूल परिस्थितीत आणि 10 बाय 10 च्या खोलीत शिक्षण घेणारा, संगणकात तरबेज होऊन थेट जागतिक पातळीवरील गुगलच्या परीक्षेत देशात तिसरा आलेला व गुगलच्या कॅलिफोर्निया मधील प्रमुख कार्यालयात कामाला लागलेला आशिष चौधरी, यूपीएससी(आयएएस) परीक्षा पास झालेला सिंधी समाजातील पहिलाच विद्यार्थी आशिष रेवलानी, प्रतिकूल परिस्थितीत एमपीएससी(मुख्याधिकारी)ची परीक्षा उत्तीर्ण झालेली मनीषा वांजळ, सीएची परीक्षा पास झालेला मोहित दुसेजा आणि अवघ्या 10 वर्षाचा असतानाही कितीही संख्येचे क्षणातच कॅल्क्युलेशन करणारा आयुष वाधवानी यांचा स्मृतिचिन्ह देऊन जाहीर गौरव करण्यात आला.

शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे,उल्हासनगर विधानसभा संपर्क प्रमुख नरेंद्र शिंदे,उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे, सुमित सोनकांबळे, नगरसेवक सुरेंद्र सावंत, नगरसेविका लिलाबाई आशान, शितल बोडारे, वसुधा बोडारे, मंदा सोनकांबळे,संगीता सपकाळे, प्रा.वि.वि.पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवानी, परमानंद गेरेजा आदी यावेळी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com