कंपनीची मालकी देण्याच्या भूलथापा मारून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

साडेतीन कोटी लुबाडले; सहा खाती गोठवली
मुंबई - एका कंपनीचे वितरण व एका कंपनीचे मालकी हक्क देण्याच्या भूलथापा मारून साडेतीन कोटी रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी योगेश सूर्यकांत पैठणकर (वय 35) याला अटक केली. या प्रकरणातील आरोपीची सहा खाती गोठवण्यात आली आहेत.

पैठणकर याच्याविरोधात नवघर, पालघर, बोळींज, मोखाडा, वाणगाव, तारापूर आदी पोलिस ठाण्यांतही आर्थिक स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पालघरमधील जव्हार पोलिसांनी त्याला नुकतीच एका प्रकरणात अटक केली होती. त्यांच्याकडून आरोपीचा ताबा घेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. तक्रारदार रोनाल्ड जॉन फर्नांडिस हे घाटकोपर येथील रहिवासी असून शेखर जोशींसोबत ठाण्यात ते केबल नेटवर्कचा व्यवसाय करतात. 21 जानेवारी 2014 मध्ये फर्नांडिस व जोशी यांना दोन मुख्य आरोपींनी ऑटोमॅक्‍स टेक्‍नॉलॉजीचे वितरण व मे. कस्तुरी रीचार्जची मालकी देण्याच्या भूलथापा देऊन मार्च 2014 ते जुलै 2014 या कालावधीत सुमारे पाच कोटी रुपये घेतले. त्यातील दोन कोटी पाच लाखांचे रीचार्ज मिळाले असून, उर्वरित तीन कोटी 48 लाखांची रक्कम अद्याप मिळालेली नाही; तसेच कंपनीची मालकीही मिळालेली नाही. पैसे न मिळाल्यामुळे अखेर फर्नांडिस यांनी केलेल्या तक्रारीवरून घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अखेर आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी पैठणकरला अटक केली.