विकास ओबेरॉय भामटाच

विकास ओबेरॉय भामटाच

मुंबई - सकृतदर्शनी ओबेरॉय रिअल्टीचे विकास ओबेरॉय ही व्यक्ती म्हणजे लोकांची फसवणूक करणारा विकासक असल्याचे दिसत असल्याने, त्याच्याविरोधातील फौजदारी तपास यापुढच्या काळातही सुरूच ठेवण्याचे आदेश अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी दिले. मेघवाडी पोलिसांनी सादर केलेला तपास पूर्ण करण्याबाबतचा सारांश अहवाल (सी समरी रिपोर्ट) स्वीकारण्यासही दंडाधिकाऱ्यांनी नकार दिला.

फ्लॅट खरेदीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी पुरेसे मुद्दे विकास ओबेराय याच्याविरोधात दिसत आहेत. त्यांच्याविरोधात तपास केला जाऊ शकतो, असे अंधेरी महानगर दंडाधिकारी अमिताभ पंचभाई यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे ओबेरॉय याच्याविरोधातील प्रथमदर्शनी अहवाल (एफआयआर) रद्द न करता, तपास सुरू ठेवा, असे सांगत, पुढील सुनावणी त्यांनी 18 एप्रिलपर्यंत तहकूब केली. जोगेश्‍वरी-विक्रोळीला जोडणाऱ्या रस्त्यावर (जेव्हीएलआर) तब्बल 1296 फ्लॅट असलेल्या सहा आलिशान इमारती विकास ओबेरॉय यांनी बांधल्या आहेत. या इमारतीतील प्रत्येक फ्लॅटमध्ये 94 चौ.फूट बिल्टअप व 40 चौ.फूट कार्पेट एरिया मिळून तब्बल 120 कोटी रुपयांना विकसकाने गंडविल्याची बाब 2013 मध्ये एका फ्लॅट खरेदीदाराच्या लक्षात आली. त्यामुळे पैशाचा अपहार केल्याप्रकरणी सोसायटी नोंदणी करतेवेळी फसवणूक आणि खोटारडेपणा केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच सोसायटीत दिल्या जाणाऱ्या इतर सोई-सुविधांच्या जागेवर विकसकाने ग्रॅण्ड नावाची दुसरी इमारत उभी केली. या बांधकामात विकास योजनेच्या व चटई क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली होती.

या प्रकरणात सोसायटीतील सदस्यांनी ओबेरॉय स्प्लेंडॉर हा फ्लॅट ओनर असोसिएशन (ओएसएफओए) स्थापन करून त्यांनी मेघवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. विशेष म्हणजे "ओएसएफओए'मध्ये मोहित भारद्वाज हे ओबेरॉय रिअल्टीचे आणखी एक संचालक तक्रारदार आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर 3 सप्टेंबर 2013 ला मेघवाडी पोलिस ठाण्यात विकास ओबेरॉय, विक्री व्यवस्थापक रिचेल्ल चॅटर्जी, अरुण कोटियन, सोमिल दारू व मे. ओबेरॉय रिअल्टी लिमिटेडविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com