गिरणी कामगारांसाठी 50 टक्के घरे राखीव ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील घर योजनेतून यापुढे तयार होणाऱ्या सदनिकांमधील 50 टक्के सदनिका गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयाने सध्या या तत्त्वावर सुरू असलेल्या सदनिकांपैकी 9761 जास्तीच्या सदनिका गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणार आहेत. या सरकारकडून याआधी 320 चौरस फुटांच्या 10 हजार 768 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता त्यांची संख्या 20 हजार 509 इतकी झाली आहे.

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या भाडेतत्त्वावरील घर योजनेतून यापुढे तयार होणाऱ्या सदनिकांमधील 50 टक्के सदनिका गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या निर्णयाने सध्या या तत्त्वावर सुरू असलेल्या सदनिकांपैकी 9761 जास्तीच्या सदनिका गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणार आहेत. या सरकारकडून याआधी 320 चौरस फुटांच्या 10 हजार 768 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता त्यांची संख्या 20 हजार 509 इतकी झाली आहे. मुंबई शहर व उपनगर क्षेत्रात कोणत्या ठिकाणी किती घरे निर्माण करता येतील, याबाबत तसेच सध्या उपलब्ध असलेल्या घरांबाबत अंतिम आराखडा तयार करण्यात येत आहे. समाजातील सर्व घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, पंतप्रधान गृहकुल योजनेंतर्गतदेखील कामे हाती घेण्यात आली आहेत.