बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

मुंबई - गोरेगावमधील आरे वसाहतीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला. दर्शना मुथुवेली (वय 4) असे तिचे नाव आहे. मंगळवारी (ता.9) तिचा मृतदेह जंगलात पोलिसांना सापडला.

मुंबई - गोरेगावमधील आरे वसाहतीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाला. दर्शना मुथुवेली (वय 4) असे तिचे नाव आहे. मंगळवारी (ता.9) तिचा मृतदेह जंगलात पोलिसांना सापडला.

दर्शना ही आरे वसाहतीतील युनिट 13 मध्ये कुटुंबासोबत राहत होती. सोमवारी (ता.8) रात्री जेवल्यानंतर ती हात धुण्याकरिता घराबाहेर गेली. बराच वेळ ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. ती सापडली नाही; मात्र कुत्री भुंकताना दिसली. आरे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह जंगलात सापडला. अंगावरील जखमांवरून तिच्यावर बिबट्याने हल्ला केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.