बालसाहित्याने कोणत्याही विषयाला वर्ज्य करू नये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई ः आजची पिढी पुढारलेली आहे. त्यामुळेच बालसाहित्य लिहिताना कोणत्याही विषयाला वर्ज्य करून चालणार नाही, असे मत मान्यवर साहित्यिकांनी नुकत्याच झालेल्या "टाटा लिटरेचर फेस्टिव्हल'मध्ये मांडले.

मुंबई ः आजची पिढी पुढारलेली आहे. त्यामुळेच बालसाहित्य लिहिताना कोणत्याही विषयाला वर्ज्य करून चालणार नाही, असे मत मान्यवर साहित्यिकांनी नुकत्याच झालेल्या "टाटा लिटरेचर फेस्टिव्हल'मध्ये मांडले.

या फेस्टिव्हलमध्ये "लव्ह, डेथ, कास्ट' या विषयावर परिसंवाद झाला. जात, वर्ग, मृत्यू, प्रेम, लैंगिकता हे विषय गंभीर आहेत, असे आपण मानतो. त्यामुळे साहजिकच बालसाहित्यामध्ये ते येत नाहीत; मात्र मुलांनी काय वाचावे, काय वाचू नये, हे ठरवणे योग्य नव्हे. त्याचप्रमाणे गुडीगुडी साहित्य देण्याऐवजी त्यांना हवे ते वाचण्याची मोकळीक असावी. बालसाहित्याला कोणताही विषय वर्ज्य नसावा, यावर परिसंवादातील वक्‍त्यांचे एकमत झाले. परिसंवादात लेखिका देवप्रिया लहिरी, प्रा. लीना सबनानी, डकबिल प्रकाशनाच्या सयोनी बसू सहभागी झाले होते.

"जय जवान' या परिसंवादात आत्तापर्यंतच्या युद्धांचा आढावा घेण्यात आला. जवान आपले प्राण तळहातावर घेऊन लढाईला सज्ज होतात; मात्र ते शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला जातो का? त्यांच्या कुटुंबीयांना पुरेसे आर्थिकसाह्य मिळते का? असे अनेक प्रश्‍न जॉन होर्ने, उवी सिन्हा, रघू कर्नाड यांनी उपस्थित केले.
"नवाब, न्यूड, नूडल्स' या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या परिसंवादात "ऍड'गुरू ऍम्बी परमेश्‍वर यांनी पाच वर्षांतील समाजबदलाचा परिणाम जाहिरात क्षेत्रावर कसा झाला, याबाबत विवेचन केले. समाजमन बदलण्याचे श्रेय जाहिरात क्षेत्राकडे जात असल्याचे मतही त्यांनी मांडले.

मुंबई

ठाणे - ठाणे स्थानकात उभारण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी सॅटीस पुलाला गळती लागली आहे. पावसाचे पाणी थेट पुलाखालून मार्गक्रमण...

04.15 AM

नवी मुंबई - आठवडाभर अधूनमधून पडणाऱ्या पावसाची शनिवारपासून संततधार सुरू झाली. त्यामुळे शहरातील रस्तेदुरुस्ती पुन्हा खड्ड्यांत गेली...

04.03 AM

शहापूर - शहापूर तालुक्‍यात शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधारेने धुमाकूळ घातला असतानाच रविवारी दुपारी भातसा धरणाच्या...

03.15 AM