शहरातील 3400 बांधकामांवर हातोडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवी मुंबई - नवी मुंबई शहरातील बेकायदा बांधकामांवर सरकारी यंत्रणांकडून जोरदार हातोडा पडला असून, गेल्या वर्षभरात तब्बल तीन हजार 400 हून अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाच्या मुदतीमुळे सिडको, नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी यांनी संयुक्तपणे कारवाई करीत सरकारी जमिनींबरोबरच आरक्षित भूखंड मोकळे केले. 

नवी मुंबई - नवी मुंबई शहरातील बेकायदा बांधकामांवर सरकारी यंत्रणांकडून जोरदार हातोडा पडला असून, गेल्या वर्षभरात तब्बल तीन हजार 400 हून अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाच्या मुदतीमुळे सिडको, नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी यांनी संयुक्तपणे कारवाई करीत सरकारी जमिनींबरोबरच आरक्षित भूखंड मोकळे केले. 

सिडकोने मुंबईशेजारी वसविलेले नियोजनबद्ध शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. मात्र, नियोजनबद्ध शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबईला काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांनी ग्रासले आहे. त्यात गावठाण विस्तार न झाल्याने भूमाफियांनी उभ्या केलेल्या बेकायदा बांधकामांचे जिवंत उदाहरण म्हणजे दिघा नोड ठरला आहे. मात्र, अशा भूमाफियांवर नियंत्रण ठेवून बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांनी 2016 मध्ये जोरदार कारवाई केली. सर्वधर्मीय धार्मिक स्थळे व बेकायदा बांधकाम अशा तीन हजार 400 पेक्षा जास्त बांधकामे जमीनदोस्त करण्यात तिन्ही सरकारी यंत्रणांना यश आले. केवळ सिडको प्रशासनाने दोन हजारांपेक्षा जास्त लहान-मोठ्या इमारती, झोपड्या, बैठ्या चाळी, वाढीव बांधकामे अशा स्वरूपाच्या बांधकामांवर हातोडा चालविला. एमआयडीसीनेही वर्षभरात 988 बांधकामे पाडली. एमआयडीसीच्या कारवाईदरम्यान पथकावर भूमाफियांनी दगडफेकही केली होती. मात्र, त्यानंतरही दुसऱ्या दिवशीही कारवाई थांबली नाही. नवी मुंबई महापालिकेनेही यंदा 295 बांधकामे पाडली आहेत. त्यात चार ते सात मजली इमारती, बैठ्या चाळींसह वाढीव बांधकामांचा समावेश आहे. 

धार्मिक स्थळांवरील कारवाई मुदतीत 
2009 नंतरची बेकायदा सर्वधर्मीय धार्मिक स्थळांवरची कारवाई पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार नवी मुंबई महापालिका, सिडको व एमआयडीसी यांनी मुदतीमध्ये शंभरपेक्षा जास्त धार्मिक स्थळांवर कारवाई केली; परंतु उर्वरित 300 धार्मिकस्थळे 2009 च्या आधीची असून, त्यांच्याबाबतीत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवून सुनावणीनंतर भूमिका घेतली जाणार आहे. 

पाडलेली बांधकामे 
सिडको - 2000 
एमआयडीसी - 988 
महापालिका - 395 

मुंबई

मुंबई - सध्याच्या जीवनशैलीमध्ये इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटशिवाय पान हलत नाही; मात्र टाकावू लेक्‍ट्रॉनिक वस्तू इतस्ततः फेकल्यामुळे...

12.42 AM

मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यंदा प्रथमच पर्यटकांसाठी गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन...

12.42 AM

कल्याण - नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात गेलेली मराठी कुटूंब आजही आपली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहेत....

बुधवार, 23 ऑगस्ट 2017