नागरिक, सरकारने नद्या वाचवाव्या - राजेंद्र सिंह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई - मुंबईतील नद्या वाचवण्यासाठी नागरिकांनी आणि सरकारने एकत्रित काम करावे, असे आवाहन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी रविवारी (ता.5) येथे केले. 

नद्या वाचवण्यासाठी काम करणाऱ्या "रिव्हर मार्च' या संघटनेच्या नदी परिक्रमा कार्यक्रमात राजेंद्र सिंह बोलत होते. या कार्यक्रमाला 15 हजार मुंबईकरांनी साथ दिली. 

शनिवारी दहिसर नदी, रविवारी पोईसर, मिठी आणि ओशिवरा नदीवर परिक्रमा करण्यात आली. या चारही नद्यांच्या तीन किलोमीटर परिसरात नागरिकांनी पदयात्रा काढली. दहिसर नदीपात्रात उतरून नागरिकांनी नदीपात्र स्वच्छ केले. सध्या पोईसर नदीच्या उपनदीत होणाऱ्या बांधकामाचा मुद्दा गाजत आहे. ही नदी आयसीयूत गेली आहे. तिच्यावर त्वरित उपचार करण्याची गरजही सिंह यांनी व्यक्त केली. नदीच्या पात्रातही बांधकाम केल्याने नदीचे गटार झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 

या परिक्रमेत शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. पोईसर नदीच्या परिक्रमेसाठी खासदार गोपाल शेट्टी आणि आमदार योगेश सागर उपस्थित होते. या परिक्रमेला मराठी आणि हिंदी कलाकारही उपस्थित होते.

Web Title: Citizens, government save rivers