महापालिकेने दिलेल्या निधीतून रेल्वे हद्दीतील नालेसफाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मानखुर्द रेल्वे स्थानकापर्यंत हार्बर रेल्वेवर मध्य रेल्वे करत असलेल्या नालेसफाईच्या कामांची पाहणी गुरुवारी पालिका आयुक्त अजोय मेहता आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी केली. यंदा रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईच्या कामांत रेल्वेचा पालिकेशी चांगला समन्वय आहे. ही कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील, असा विश्‍वास आयुक्तांनी व्यक्त केला. रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईसाठी दोन कोटी 79 लाखांचा खर्च येणार आहे. 

पावसाचे पाणी तुंबून रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडू नये यासाठी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे रेल्वे करत आहे. रेल्वेच्या हद्दीतील छोट्या पुलांखालील नाल्यांची सफाई रेल्वे करत आहे. त्यासाठी पालिकेने रेल्वेला दोन कोटी 79 लाख 69 हजार 328 रुपये दिले आहेत. मध्य रेल्वेच्या वतीने हार्बरवरील नालेसफाईच्या कामांची पाहणी गुरुवारी पालिका आयुक्त आणि रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी केली. त्यांनी रेल्वेच्या टॉवर वॅगनमधून प्रवास केला.