सहकारी बॅंकांचे योगदान महत्त्वाचे - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - सामाजिक परिवर्तनात सहकारी बॅंकांचे महत्त्वाचे योगदान आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी सहकार हा एकमेव मार्ग आहे. सहकाराला चांगले दिवस येण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे, असे मत वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्‍त केले. अपना सहकारी बॅंकेच्या सुवर्णमहोत्सवी सांगता सोहळ्यात ते बोलत होते.

सहकारी बॅंकांचे यश हे त्यांनी मूळ सहकाराचा हेतू किती जपला आहे, यावर अवलंबून असते. अपना बॅंकेचे यश त्या दृष्टीने शंभर टक्के आहे, असे गौरवोद्‌गार प्रभू यांनी काढले. सहकारी बॅंकांनी एकत्र येऊन एक पार्लमेंटरी फोरम स्थापन करावी, तसेच फोरमचे नेतृत्व अपना बॅंकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी करावे, अशी अपेक्षा प्रभू यांनी व्यक्त केली.

Web Title: Co-operative bank suresh prabhu